लोकहितमंच सेवा फाऊंडेशन

जाणीव • जागृती • कृती

समाजातील सज्जन शक्तीला एकत्रीत करून रचनात्मक कार्यात सहभागी घेणारी संस्था

आमची दृष्टी

निरपेक्ष भावनेने लोकहिताचे कार्य करणे आणि "एकमेकांना सहाय्य करू" हा भाव जागवणे. समाजातील समस्यांविषयी जाणीव जागृती करून त्या सोडवण्यासाठी कृतिशीलतेतून प्रयत्न करणे.

तेरा कोटी नामोत्सव २०२५

श्रीराम जयराम जयजयराम

श्रीराम समर्थ

  • सद्गुरू श्री श्रीराम महाराजांच्या कृपाशिर्वादाने व प्रेरणेमुळे, सालाबादप्रमाणे तेरा कोटी नामोत्सव नवरात्राचे आयोजन होत आहे.
  • सदर कालावधीत आपण आपल्या घरी बसून, विविध गावांमधून, राज्यांमधून, अगदी परदेशातूनसुद्धा यामधून नोंदवून जप करू शकणार आहोत.
  • YouTube व Facebook च्या माध्यमातून प्रवचने कीर्तन व इतर कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.
  • जे साधक प्रत्यक्ष येऊ शकणार नाहीत त्यांना प्रसाद टपालाद्वारे पाठवण्यात येईल.
  • दिनांक: भाद्रपद पौर्णिमा (रविवार) ७ सप्टेंबर २०२५ ते भाद्रपद वद्य अष्टमी (रविवार) १४ सप्टेंबर २०२५
  • स्वरूप: ५ दिवस ऑनलाइन + ३ दिवस प्रत्यक्ष व ऑनलाईन दोन्ही
तेरा कोटी नामोत्सव २०२५ बॅनर
तेरा कोटी नामोत्सव २०२४

गेल्या वर्षीचा नामोत्सव

हजारो साधकांचा सहभाग

नोंदणी सुरू आहे!

आत्ताच नोंदणी करा आणि पवित्र नामोत्सवात सहभागी व्हा

संस्थेचा परिचय

लोकहितमंच सेवा फाऊंडेशन ही संस्था, समाजातील सज्जन शक्तीला एकत्रीत करून रचनात्मक कार्यात सहभागी घेणार आहे.

आमचे कार्यक्षेत्र

विविध समस्या किंवा समाज म्हणून एकत्रीत करावयाच्या गोष्टींविषयी जाणीव करून देणे

समाजामध्ये जागृती निर्माण करणे आणि एवढे करून न थांबता प्रत्यक्ष समाजाला सक्रिय करून कृती करणे

आपआपल्या नोकरी व्यवसायात व्यस्त असलेल्या लोकांचा सहभाग घेऊन जनतेच्या समस्या दूर करणे

आमची कार्यपद्धती

अनेकवेळा असे लक्षात येते की केवळ कोणीतरी पुढाकार घेतल्याने काम मार्गी लागले परंतु पुढाकार कोण घेणार याची वाट बघत राहिल्याने छोट्याछोट्या किंवा मोठ्या समस्या वर्षानुवर्षे तशाच राहतात.

लोकहितमंच सेवा फाऊंडेशनच्या कार्यात सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे. आपण एखादी समस्या, एखादी अडचण किंवा सामान्य जनतेच्या हिताला बाधक असलेली अथवा सहाय्यभूत परंतू अपूर्ण बाब लक्षात आणून देऊ शकता.

यशस्वी उपक्रम

यावर्षी नवरात्रोत्सवात श्री अंबा व श्री एकवीरा देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी पादत्राणे व्यवस्थापनाचे कार्य यशस्वीपणे पूर्ण केले आहे. अमरावतीकर जनतेने आमच्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

तेरा कोटी नामोत्सव: गेल्या अनेक वर्षांपासून सद्गुरू श्री श्रीराम महाराजांच्या कृपाशिर्वादाने तेरा कोटी नामोत्सव नवरात्राचे यशस्वी आयोजन करीत आहोत. हजारो साधकांचा सहभाग घेऊन तेरा कोटी जप संकल्प पूर्ण करण्यात यश मिळवले आहे.

तेरा कोटी नामोत्सव २०२५

कार्यक्रमाची माहिती

सद्गुरू श्री श्रीराम महाराजांच्या कृपाशिर्वादाने व प्रेरणेमुळे, सालाबादप्रमाणे तेरा कोटी नामोत्सव नवरात्राचे आयोजन होत आहे.
सदर कालावधीत आपण आपल्या घरी बसून, विविध गावांमधून, राज्यांमधून, अगदी परदेशातूनसुद्धा यामधून नोंदवून जप करू शकणार आहोत.
YouTube व Facebook च्या माध्यमातून प्रवचने कीर्तन व इतर कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.
जे साधक प्रत्यक्ष येऊ शकणार नाहीत त्यांना प्रसाद टपालाद्वारे पाठवण्यात येईल.
दिनांक: भाद्रपद पौर्णिमा (रविवार) ७ सप्टेंबर २०२५ ते भाद्रपद वद्य अष्टमी (रविवार) १४ सप्टेंबर २०२५
स्वरूप: ५ दिवस ऑनलाईन आणि ३ दिवस प्रत्यक्ष व ऑनलाईन दोन्ही
जे साधक प्रत्यक्ष येऊ शकणार नाहीत त्यांना प्रसाद टपालाद्वारे पाठवण्यात येईल.

नोंदणी माहिती

नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. आपले परिचित संकलक जप संकलक यांच्याशी संपर्क साधावा किंवा खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा:

श्रीराम महाराज सेवा मंडळ, अमरावती

तेरा कोटी नामोत्सव २०२५ अधिकृत बॅनर
तेरा कोटी नामोत्सव 2024
नामोत्सव सहभागी

प्रश्नोत्तरे

प्र
नोंदणीसाठी काय माहिती आवश्यक आहे?

प्रत्येक साधकाचे नाव, आडनाव, गाव, मोबाईल क्रमांक आणि जप संकल्प ह्या पाच गोष्टींची माहिती नोंदणी करताना अपेक्षित आहे.

आपल्याला तेरा कोटी ही जपसंख्या गाठायची आहे. संकल्प पूर्ती सद्गुरू करून घेतीलच मात्र आपल्याला प्रयत्न पूर्ण करावे लागतील.

प्र
संकल्प कसा ठरवता येऊ शकतो?

अगदी ३०-३५ मिनिट रोज जप करतील तरीही साधक दहा दिवसात सुमारे २६,००० जप करू शकतील. संकल्प ठेवला नाही तर ५ माळा देखील जास्त वाटतात.

५२,०००
१-१.२५ तास दररोज
१,३०,०००
३-३.५ तास दररोज
२,६०,०००
६-७ तास दररोज

आपल्याला जी जपसंख्या सहज साध्य वाटते त्याहून थोडा अधिक संकल्प ठेवावा. याने नामोत्सवात प्रगती करू शकू.

प्र
कोण नोंदणी करू शकतं? वयोमर्यादा काय?

सर्वजण जपास नोंद करू शकतात, सोयर, सुतक व स्त्रियांचे मासिक धर्माचे दिवस वगळता सर्व दिवसांचा जप मोजला जाऊ शकतो.

वयोमर्यादा नाही - अनुभव असा आहे की ७ वर्षांवरील बालके देखील स्थिरतेने जप करतात.

प्र
जप केव्हा करू शकतो?

आपण जप २४ तास केव्हाही करू शकता. दि.७ सप्टे २०२५ ते १४ सप्टे २०२५ सायं ७ वा पर्यंत अहोरात्र केव्हाही करू शकता.

महत्वाचे: आपल्या दैनंदिन जपाची नोंद आपल्या जप संकलाकांकडे दररोज करावी.

प्र
जप कसा करावा?

संख्यात्मक जपाचे महत्व असल्याने जपसांख्या मोजावी. जप करण्याचे विविध मार्ग:

📿 जपमाळ पद्धती

जपमाळ ही १०८, ५०० इ. मण्यांची असते. 'श्रीराम जयराम जयजयराम' असा मंत्रोच्चार करून मणी ओढावा. माळ मध्यमा, अनामिका व अंगठा यात धरावी. मेरुमण्यापर्यंत पोहोचल्यावर एक माळ पूर्ण होईल. मेरुमणी पार करू नये.

📱 डिजिटल पद्धती

जपयंत्र (इलेक्ट्रॉनिक/मेकॅनिकल काउंटर), बोटांच्या पेरांवर, मोबाईल App वापरून मोजणी करता येते.

📲 शिफारस केलेले App डाउनलोड करा
⏰ कामकाजातील जप

आपण काम करता करता देखील जप करू शकतो. १० मिनिटे बसून किती जप होतो हे मोजून घ्या व त्याप्रमाणे कामाच्या वेळेत जपाचा अंदाज करा. पूजनीय प्रल्हाद महाराजांनी सांगितले: "जात्यावर दळता दळता जप केला तर एका तासात तीन हजार जप होऊ शकतो."

संस्थेची उद्दिष्ट्ये

निरपेक्ष भावनेने, लोकहिताचे कार्य करणे आणि "एकमेका सहाय्य करू" हा भाव जागवणे

जाणीव जागृती

सार्वत्रिक समस्यांविषयी जाणीव जागृती करणे आणि समस्येचे नीट आकलन करून ती सोडविण्यासाठी आराखडा तयार करणे.

शासकीय पाठपुरावा

त्यासंबंधी शासकीय स्तरावर निवेदन देणे, पाठपुरावा करणे आणि लोकसहभागासाठी प्रोत्साहित करणे.

कृतिशील कार्य

कृतिशिलतेतून समस्या निवारणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आणि आवाहन करणे.

निरपेक्ष सेवा

निरपेक्ष भावनेने, लोकहिताचे कार्य करणे आणि "एकमेका सहाय्य करू" हा भाव जागवणे.

आपला सहभाग अपेक्षित

तन-मन-धनाने आपण सहभागी व्हावे. असे अनेक उपक्रम भविष्यात राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.

आमच्यात सामील व्हा

आमचे कार्यक्रम

समाजाच्या विविध आवश्यकांना उत्तर देणारे व सामाजिक कल्याणाकरिता उपयुक्त ठरणारे कार्यक्रम

तेरा कोटी नामोत्सव २०२५

दि.७ ते १४ सप्टेंबर २०२५ - तेरा कोटी जप संकल्प. सद्गुरू श्री श्रीराम महाराजांच्या कृपाशिर्वादाने नामोत्सव

सविस्तर माहिती

धार्मिक सेवा

नवरात्रोत्सवात श्री अंबा व श्री एकवीरा देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी पादत्राणे व्यवस्थापन आणि इतर धार्मिक सेवा

सामुदायिक सेवा

समाजातील विविध समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांचे निराकरण करण्यासाठी स्थानिक समुदायासह मिळून काम करणे

शासकीय संपर्क

जनतेच्या समस्यांसाठी शासकीय स्तरावर निवेदन देणे, पाठपुरावा करणे आणि योग्य ती कार्यवाही करवून घेणे

जनजागृती

लोकसहभागासाठी प्रोत्साहित करणे आणि सामाजिक समस्यांविषयी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे

तत्काळ मदत

आपत्कालीन परिस्थितीत आणि तात्काळ मदतीची गरज असलेल्या व्यक्ती किंवा कुटुंबांना सहाय्य पुरवणे

संपर्क

आमच्याशी संपर्क साधा आणि सामाजिक कल्याणाच्या कार्यात सहभागी व्हा

संपर्क माहिती

पत्ता

C/O Pramodini Janardan Jog, Sawata Mali Colony, H. V. Nagar, Amravati, Maharashtra.

ईमेल

info@lokhitmanch.site

फोन

९८२३३०२४४०

आमच्यात सामील व्हा

लोकहितमंच सेवा फाऊंडेशनच्या कार्यात सहभागी होऊन समाजसेवेचे धाटणी कार्य करा. तन-मन-धनाने योगदान द्या आणि समाजातील बदल घडवून आणा.

संदेश पाठवा